राजनाथसिंहांवरील आरोप तूर्त वगळला

मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (08:58 IST)
मोहंमद सलीम यांनी केलेला आरोप 24 तासांसाठी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला असून, त्याची पूर्ण शहानिशा केल्यानंतरच ते वाक्य सभागृहाच्या कामकाजात नोंदवायचे की नाही, याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेणार आहेत.
 
देशातील वाढत्या असहिष्णुतेवरील चर्चेला सुरुवात करताना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार मोहंमद सलीम यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यावर केलेला गंभीर आरोप वादावादीनंतर कामकाजातून वगळण्यात आला. नियम 353 अंतर्गत नोटीस न देता सभागृहाच्या सदस्यावर थेट आरोप केल्यामुळे ते कामकाजातून वगळण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी घेतला.
 
मोहंमद सलीम यांनी थेट राजनाथसिंह यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे लोकसभेमध्ये सोमवारी तीव्र गोंधळाचे वातावरण निङ्र्काण झाले. दोन्ही बाजूंचे सदस्य ऐकत नसल्यामुळे अध्यक्षांनी सुरुवातीला कामकाज एक तासासाठी आणि नंतर थोडय़ा थोडय़ा कालावधीसाठी तहकूब केले. दुपारी चार वाजता कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी मोहंमद सलीम यांचा आरोप कामकाजातून वगळण्याचा निर्णय दिला आणि त्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात झाली.

वेबदुनिया वर वाचा