रशियन सुनेला मिळाला न्याय, जुळले नाते

आग्रा- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्तक्षेपानंतर एका रशियन सूनेला न्याय मिळाला. मूळची रशियन असलेली ओल्गा इफिमेनकोव्हा शनिवारपासून आग्र्यातील सासू-सासर्‍यांच्या घराबाहेर पती आणि तीन वर्षाच्या मुलासोबत बेमुदत उपोषणाला बसली होती.
 
सासूने घरात प्रवेश नाकारला म्हणून उपोषणाला बसलेल्या रशियन सूनेला अखेर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. या घटनेमुळे देशाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सासूने ओल्गाला संपत्तीमधील वाटा आणि घरात प्रवेश नाकारला होता. या ट्विटनंतर आग्रा पोलिसांनी हस्तक्षेप करत सासू-सूनेचे जुळवून आणले. ओल्गाने 2011 मध्ये विक्रांत सिंह चंडेलबरोबर विवाह केला असून त्यांना एक मुलगा आहे. आतापर्यंत विक्रांत आणि ओल्गा गोव्यात राहून बिझनेस करत होते. पण बिझनेसमध्ये नुकसान झाल्यामुळे ते पुन्हा घरी परतले.
 
जेव्हा हे दांम्पत्य घरी पोहोचले तेव्हा विक्रांतची आई निर्मला चांडेल यांनी संपत्तीमधील वाटा आणि घरात प्रवेश नाकारला. यानंतर ओल्गा नवरा आणि मुलासह घराबाहेरच उपोषणाला बसली होती.

वेबदुनिया वर वाचा