याकुब मेमन : सी. ए. ते फाशीचा फंदा

गुरूवार, 30 जुलै 2015 (11:11 IST)
30 जुलै 1962 मध्ये मुंबईत जन्मलेल्या याकूब मेमनचे लहानपण मुंबई सेंट्रल रेल्वे लाईन भायखळामध्ये गेले. १९८६ मध्ये त्यांनी बी.कॉम. केले आणि 1990 मध्ये तो सी.ए. उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने त्याचा मित्र चेतन मेहतासोबत भागीदारी करून मेहता अ‍ॅण्ड मेमन असोसिएट्स या संस्थेची स्थापना केली.

त्यानंतर चेतनने या संस्थेशी संबंध तोडले. त्यानंतर मेमनने ए आर अ‍ॅण्ड सन्स ही दुसरी फर्म स्थापन केली. नंतर तो मुंबईतील नामांकित चार्टर्ड अकाऊंटंट बनला त्याला याबाबत पुरस्कारही मिळालेला आहे. त्यानंतर त्याने एक एक्सपोर्ट कंपनी काढून परदेशात मांस पुरवठा करीत होता.

1993च्या साखळी बॉम्बस्फोटांतील दोषी याकूब अब्दुल रज्जाक हा पूर्वी शिकला सवरलेला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणला जात असे. मेमन कुटुंबीयांत ता सर्वांत जास्त शिक्षण घेतलेला. याकूब व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट होता आणि आपली स्वतःची संस्था चालवित होता.

या संस्थेच्या माध्यमातून तो त्याचा भाऊ टायगर मेमनचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार सांभाळत असे. शिक्षणात आवड असणा-या याकूबने तुरुंगातदेखील आपले पुढील शिक्षण सुरूच ठेवले होते. त्याने इंग्रजी विषयात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून 2013 मध्ये एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तसेच तो सध्या याच विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत होता.

वेबदुनिया वर वाचा