मोदींनी एकही सुटी घेतली नाही

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सरकारी कामकाज सुधारण्यासाठी तसेच विकासाला गतिमान करण्यासाठी दोन वर्षात एकदाही वैयक्तिक कारणांसाठी सुटी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान म्हणून सलग दोन वर्षात एकदाही सुटी न घेणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
पंतप्रधान कार्यालयात पारदर्शिकता आणण्यासाठी मोदींनी सुरूवात केली असून केंद्रातील सर्वच विभागातील अधिकार्‍यांना मोदी आवर्जून भेटत असतात. तसेच मुख्य सचिवासह पोलीस महासंचालक यांच्याशी चर्चा करीत असतात. पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) सध्या फायलींचा निपटारा लवकर केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांना भेटी दिल्या असून ते यापुढेही वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत.
 
विदेश दौर्‍यावर जात असताना वेळ वाचावा यासाठी पंतप्रधान मोदी हे रात्रीचा प्रवास करणे पसंत करतात. विदेशात गेल्यानंतर सकाळी किंवा सायंकाळी कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्रीच मायदेशी रवाना होत असतात. मायदेशी परतल्यानंतर मोदी तत्काळ कामांना सुरूवात करतात, तसेच अनेकदा ते प्रवासादरम्यानही काम करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा