नैनिताल- मधुचंद्र साजरा करण्यासाठी नैनिताल आलेल्या एका दांपत्यावर तेव्हा बाका प्रसंग ओढवला जेव्हा पहाटे बिबट्या त्यांच्या खोलीत शिरला. दांपत्याचे नशीब बलवत्तर होते, की त्यांच्यावर हल्ला न करता बिबट्या बाथरूममध्ये जाऊन बसला.
मधुचंद्रासाठी मेरठहून आलेल्या सुमितने सांगितले की पहाटे सुमारे पाच वाजता अचानक खिडकीची काच तुटल्याचा आवाजाने झोप उडाली तर एक बिबट्या खोलीत शिरत आहे पाहून धक्काच बसला. पत्नीसोबत पटकन चादरीच्या आत शिरलो आणि हळूच बघितले तर बिबट्या बाथरूममध्ये जात होता. लगेच बाथरूमचे दार बंद करून मी हॉटेलच्या कर्मचार्यांना मदतीसाठी पाचारण केले.