चुंबन घेणारी सदर महिला चिकमंगळुरु जिल्ह्यातील तरीकेरे येथील तालुका पंचायत सदस्य आहे. रविवारी एका जाहीर कार्यक्रमात तिला सन्मानित केल्यानंतर तिने सर्वासमक्ष मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गालाचे चुंबन घेतले. सिद्धरमय्या ज्या कुरुबा समाजातून येतात त्या समाजाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.