एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार होती. भारताच्या एनएसजीमधील प्रवेशाच्या प्रयत्नांवर आपल्या विरोधाचे स्पष्ट संकेत देताना चीनने बुधवारी एनएसजीच्या सदस्यांमधील मतभेदांचा दाखला दिला होता. यापूर्वी अमेरिका आणि फ्रान्स यांनी भारताची बाजू घेताना सदस्य देशांनीही भारताला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. भारताला सुमारे वीस देशांचा पाठिंबा आहे. मात्र, एनएसजीमधील निर्णय सर्वसंमतीने होत असल्यामुळे भारताच्या मार्गात चीनने अडथळा आणला आहे.