पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

जमिनीवरून जमिनीवर 200 ते 250 किलोमीटरपर्यंत मारा करणार्‍या पृथ्वी- 2 या क्षेपणास्त्राची ओरिसातील बालासोर येथील परीक्षण केंद्रावर आज पहाटे यशस्वी चाचणी करण्यात आली.

या प्रकल्पाशी संलग्न असलेल्या आधीकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राला संरक्षण आणि विकास संघटन(डिआरडीओ) ने विकसीत केले आहे. तत्काळ परिणाम आणि शत्रूवर अतिजलद हल्ला करण्यासाठी हे क्षेपणास्त्र उपयुक्त असल्याचेही या आधीकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा