पाकला झटका देण्यासाठी भारताची अनोखी रणनीती

शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (11:43 IST)
उरी दहशतवादी हल्लनंतर पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याऐवजी त्यांना चहुबाजूंनी घेरण्याची रणनीती केंद्र सरकार आखत असल्याचे संकेत मिळत असतानाच, पाकच्या जखमेवर मीठ चोळण्याची चलाख चाल भारत खेळणार आहे.
 
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढय़ातील प्रमुख नेते ब्रह्मदाग बुगती यांना भारतात राजाश्रय देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्याचे सूत्रांकडून कळते. भारतीय ओळखपत्र आणि व्हिसा मिळवण्यासाठी बुगती यांनी केलेला अर्ज गृह मंत्रालयाकडे पोहोचला आहे. अर्थात, सर्व आवश्यक कागदपत्रांची शहानिशा करूनच त्यांना भारतात राजाश्रय देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
 
पाकिस्तान बलुचिस्तानात मोठा घातपात घडवू शकतो, नरसंहार करू शकतो. हात धुवून तो माझ्या मागे लागलाय. आता आम्हाला त्यांच्यापासून वाचवा, भारतात राजकीय आश्रय द्या, अशी साद बलुच रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष बुगती यांनी नरेंद्र मोदींना घातली होती. बलुचिस्तानवर पाककडून होणार्‍या अत्याचाराचा उल्लेख मोदींनी केल्यानंतर, बुगती आणि त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांचे जाहीर आभार मानले होते.

वेबदुनिया वर वाचा