तेलंगाणाची राजधानी हैदराबादच: पिल्लई

शनिवार, 12 डिसेंबर 2009 (12:20 IST)
स्‍वतंत्र तेलंगाणा मुद्यावरून देशात वाद उठले असताना आणि त्‍यामुळे केंद्र सरकारच्‍या अडचणी वाढत असताना केंद्रीय गृहसचिव जी.के. पिल्लई यांनी प्रस्‍तावित तेलंगाणा राज्‍याची राजधानी हैदराबाद राहील असे स्‍पष्‍ट केले आहे.

पिल्लई यांनी एका सुरक्षा समीक्षा बैठकीनंतर सांगितले, की हैदराबादच तेलंगाणाची राजधानी असू शकते आणि त्यात दुमत नसावे.

पिल्लई यांच्‍या या वक्तव्‍याने वेगळा वाद उपस्थित होण्‍याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा