तीसर्‍या गोलमेज परिषदेस सुरूवात

शनिवार, 2 जून 2007 (21:35 IST)
कश्मीर प्रश्नावर शांतीपूर्ण उपाय शोधण्‍याच्‍या सरकारच्या निर्णयाबरोबरच पंतप्रधान मनमोहन सिंह येथे म्हणाले की पाकिस्तानने सीमेपलीकडून होणारा आतंकवाद थांबविल्याशिवाय आमच्या प्रयत्नांना यश येणार नाही. तिसर्‍या गोलमेज परिषदेला आज सुरूवात झाली.

सात रेस कोर्स वरील पंतप्रधानांच्या सरकारी निवास स्थानी झालेल्यार हुर्रीयत आणि काही वादी संघटनांचा बहिष्कार झुगारून झालेल्या तीसर्‍या गोलमेज परिषदेत बोलताना डॉ. मनमोहन सिंह म्‍हणाले की आतंकवादामुळे येथील नागरीकांची झालेली हानी भरून काढण्‍याचा आम्‍ही सर्वतोपरी प्रयत्‍न करत आहोत की ज्‍या मुळे एका नव्‍या पर्वाला सुरूवात होईल.

ते म्‍हणाले की या जम्‍मु-काश्‍मीर मुद्‍याच्‍या दोन बाजू आहेत. एक अंतर्गत आणि दुसरी बाहेरील की ज्‍या मध्‍ये भारत-पाकीस्‍तानचा संबंध आहे. तसेच ते म्‍हणाले की या प्रश्‍नावर दोन्‍हीही बाजुंवर विचार विनिमय करून उपाय शोधावा. यासाठी सरकार विचार विनिमयाद्वारे या प्रश्नासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्‍न करत आहे.

वेबदुनिया वर वाचा