जोडप्याला मारहाण करणार्‍या पँट्री कर्मचार्‍यांना रेल्वेने ठोठावला 5 लाखांचा दंड

मुंबई- रेल्वेतल्या पँन्ट्रीकारमध्ये प्रवाशी दांपत्याला केलेल्या मारहाणी प्रकरणी पँट्री स्टाफच्या 20 जणांना 5 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी उच्चस्तरी चौकशी करण्याचे आदेशीही देण्यात आले आहे.
 
भाईदर परिसरात राहणार्‍या गुप्ता परिवाराला रविवारी रात्री कोटा ते रतलाम प्रवासादरम्याने रेल्वे पँट्रीकार मधल्या 20 कर्मचार्‍यांनी मारहाण केली होती. रेल्वेत मिळणार्‍या रेल नीर ऐवजी दुसर्‍या कंपनीच्या पाण्याची बाटली का दिली? याचा जाब विचारणार्‍या गुप्ता यांना पँट्रीकारमधल्या कर्मचार्‍यांनी मारहाण केली.
 
एका प्रवाशाने सगळा प्रकार मोबाइलच्या कॅमेर्‍याने रेकॉर्ड केला. त्यानंतर रेल्वेच्या ट्विटर हैंडलवर तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी पँट्रीकारच्या कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
भाईदरला राहणारे व्यापारी प्रदीप गुप्ता आणि त्यांची पत्नीसह कुटुंबातले 12 जण गरिबरथ एक्सप्रेसने प्रवास करत होते.

वेबदुनिया वर वाचा