जयललिता यांची दिवाळी तुरूंगातच, जामीन नाकारला

बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (10:52 IST)
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जयललिता यांना मंगळवारी कर्नाटक हायकोर्टाने जामीन नाकारला.
 
जयललिता यांना विशेष कोर्टाने शिक्षा सुनावली होती. नंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जामीन नाकारताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती ए. व्ही. चंद्रशेखर यांनी जयललितांना विशेष कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासंबधीच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. जयललिता यांना चार वर्षे कैद शंभर कोटी दंड कोर्टाने ठोठावला आहे. 

वेबदुनिया वर वाचा