पाटण : दमदार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 4.61 टीएमसीने तर पाणी उंचीत 10 फुटाने वाढ झाली आहे. धरणात आता एकूण 30.27 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणांतर्गत कोयनेसह महाबळेश्वरर विभागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नद्या, ओढे, नाल्यांसह धबधब्यांतही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणार्याह कोयना धरणात एकूण पाणीसाठा 30.27 टीएमसी झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा 25.27 टीएमसी, पाणी उंची 2077 फूट, जलपातळी 633.070 मीटर इतकी आहे. कोयना नदीवरील संगमनगर (धक्का) पूल पाण्याखाली गेला आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही 74.73 टीएमसी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे.