केरळ : बुजुर्ग महिलेवर 50 कुत्र्यांनी केला हल्ला, महिलेचा मृत्यू!

शनिवार, 20 ऑगस्ट 2016 (15:35 IST)
एक फारच वेदनादायक घटनेत एका 65 वर्षाच्या बुजुर्ग महिलेवर कुत्र्यांनी हल्ला केला आणि तिला खाऊन टाकले. शुक्रवारी रात्री राज्याच्या सचिवालयापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली. महिलेवर 50 कुत्र्यांनी हल्ला केला. हा अपघात रात्री 9च्या सुमारास झाला जेव्हा बुजुर्ग महिला टॉयलेटचा वापर करण्यास जात होती.  
 
शीलूअम्मा नावाची ही बुजुर्ग महिलेला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये येण्यात आले जेथे तिचा मृत्यू झाला. नाराज नातलग आणि त्या भागातील लोकांनी या घटनेसाठी शहराच्या प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे.  
 
पुल्लुविल्लात राहणार्‍या लोकांनी सांगितले की - आमच्यातील सहन करण्याची शक्ती आता संपली आहे. प्रशासन कुत्र्यांना न मारण्याच्या कायद्यावर लटकले आहे. काय आम्ही या कुत्र्यांपेक्षा कमतर आहे? ज्या वेळेस कुत्रे महिलेवर हल्ला करून चुकले होते, त्या वेळेस तिचा मुलगा तिला शोधण्यासाठी तेथे पोहोचला होता. स्वत:ला कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी त्याने समुद्रात उडी मारली. शीलूअम्माच्या मृत्यूनंतर 50 वर्षाचा एक इतर इसम डेजी देखील कुत्र्यांच्या हल्लाचा शिकार झाला आहे. ही घटना जवळच्या एका लोकेलिटीत झाली.

वेबदुनिया वर वाचा