नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आनंदीबेन यांच्याकडे गुजरातची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, पटेल समाजाचं आरक्षणासाठीचं आंदोलन आणि नुकताच झालेला उना येथील दलितांवरील हल्ला यामुळे भाजपाची प्रतिमा गुजरातमध्ये मलीन झाल्याची टीका होत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या राजीनाम्याकडे पाहण्यात येत आहे.