बुलंदशहरजवळ एका टोळीने मोटारीतील नागरिकांची लूट करून, मायलेकींवर सामूहिक दुष्कङ्र्क केले होते. या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटत आहेत. संसदेतही आज या प्रकरणी भाजपने आवाज उठविण्याचा निर्णय घेतला असून, उत्तर प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तर, मायावती यांनी अखिलेश यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या दुष्कङ्र्कप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बुलंद शहरजवळील घटनेची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून अखिलेश यादव यांनी राजीनामा द्यायला हवा, असे मायावती यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.