हिंदी भाषिक महाराष्ट्रात सुरक्षित: विलासराव

Gajanan GhuryeGG

मुंबईत मराठी नवनिर्माणाच्या राजकारणाने विध्वंसक वळण घेऊन अमिताभच्या 'प्रतीक्षा' बंगल्यावर हल्ला व टॅक्सीवाल्यांना मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने घटनेची तीव्र दखल घेतली आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी मुंबई सर्वांचीच असून मराठी भाषिक व हिंदी भाषिक, अशा भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करण्यासोबतच महाराष्ट्रात हिंदी भाषिक सुरक्षित असल्याची ग्वाही दिली.

राज ठाकरे व समाजवादी पक्षात काही दिवसांपासून सुरू असलेला शाब्दिक वाद रस्त्यावर उतरला असून मुंबईत रिक्षावाले व टॅक्सीवाल्यांना मारहाण करण्यात आली. टॅक्सीचीही मोडतोड व जाळपोळ करण्यात आली आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारला केली आहे.

हिंदी भाषिक राज्यात या प्रकरणाची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून लखनौ, अलाहाबादमध्ये समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बिहारमध्ये राज ठाकरेंविरूद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण प्रकरण राजकीय असून राज ठाकरे विरूद्ध समाजवादी पक्ष, असा हा वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा