मुंबईतून उत्तर भारतीयांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनाचे पडसाद आज (शुक्रवार) बिहार विधानसभेत उमटले. बिहारी आमदारांनी राज ठाकरेंविरोधातील आपला राग बिहारचे 'मराठी' राज्यपाल रा. सू. गवई यांच्यावर काढला. गवईंविरोधात घोषणा देत या आमदारांनी विधानसभा दणाणून सोडली.
अर्थात सत्तारूढ संयुक्त जनता दल व भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी या घोषणाबाजीत सहभाग घेतला नाही. बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची सुरवात आज झाली. त्यासाठी आज राज्यपाल अभिभाषणासाठी विधासभेत आले असतानाच विरोधी आमदारांनी जोरदार गोंधळाला सुरवात केली.