राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोनशे कार्यकर्त्यांनी बुधवारी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला कंटाळून आपण मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. श्री. ठाकरे यांच्या निवासस्थांनी हा कार्यक्रम झाला, असे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी सांगितले.
सध्याच्या मनसे विरूद्ध उत्तर भारतीय या संघर्षात शिवसेनेची भूमिका काय असे विचारले, असता श्री. राऊत यांनी हा संघर्ष समाजवादी पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील आहे, असे मत व्यक्त केले.