ठाकरे प्रकरणावर भाजपाची सावध प्रतिक्रिया

वेबदुनिया

शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:20 IST)
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामन्यात बिहारी खासदारांविरोधात लिहिलेल्या लेखा विषयी भाजपने सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि सेनेत युती असल्याने भाजपने या विषयी अधिक बोलणे टाळले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते मुक्तार अब्बास नक्वी यांनी या विषयी बोलताना, अशा वक्तव्याने राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येईल एवढीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करणार का? या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले.

वेबदुनिया वर वाचा