खबरदार... हे प्रकार थांबवा-उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या प्रगतीत इतर भाषकांचाही मोलाचा वाटा असल्याचे सांगत, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर तलवारींचा खेळ चालू देणार नसल्याचा सज्जड दम उपमुख्यमंत्री आर. आर.पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांवर हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हा इशारा दिला. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. येथे कोणतीही हिंसा सहन केली जाणार नसल्याचे पाटील म्हणाले.

मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून, या पुढे असे प्रकार सहन केले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा