मुंबई समुद्रात हायटाईडचा इशारा

बुधवार, 21 जुलै 2021 (11:38 IST)
मुंबईत सर्वत्र सतत मुसळधार पाऊस सुरु आहे.काही भागात तर घरात पाणी शिरल्यामुळे लोकांची तारांबळ होत आहे.मुंबईतील गोरेगाव,अंधेरी,परळ,वांद्रा मध्ये मुसळधार मेघसरी येत आहे.रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. जागोजागी पाण्याचा महापूर आला आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणारी मिठी नदी देखील ओसंडून वाहत आहे.
 
रेल्वे वाहतूक अद्याप काही ठिकाणी सुरु आहे.समुद्राला उधाण आल्यामुळे हायटाईड येण्याचा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे.तसेच महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यामध्येअतिवृष्टी होऊन त्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आले आहे.या मध्ये कोकणातील दोन पश्चिम महाराष्ट्रातील तीन असे एकूण 5 जिल्ह्याचा समावेश आहे.
 
हवामान खात्याने महाराष्ट्रात आज मुसळधार मेघसरी कोसळण्याची शक्यता वर्तवून रायगड,रत्नागिरी,पुणे,कोल्हापूर आणि सातारा या काही जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती