धक्कादायक, घरगुती भांडणातून मुलाने केली पित्याची हत्या

सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (08:41 IST)
मुंबईतील भिवंडी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती भांडणातून ६५ वर्षीय पित्याची हत्या मुलाने केली आहे. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी मुलाला अटक करून त्याच्या विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रिजेश पाटील असे आरोपीचे नाव आहे.
 
गुरुनाथ पाटील (६५) असे हत्या करण्यात आलेल्या वयोवृद्ध पित्याचे नाव आहे. गुरुनाथ हे मुलगा ब्रिजेशसह भिवंडीतील कामतघर येथे राहण्यास होते. गुरुनाथ आणि ब्रिजेश यांच्यात मागील काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. रविवारी दुपारी हा वाद विकोपाला गेला आणि ब्रिजेशने मटण कापण्याच्या चाकूने पिता गुरुनाथ यांच्या गळ्यावर आणि पोटावर वार करून जखमी केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुरुनाथ यांना नातेवाईकांनी उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती