मुंबईमध्ये महिनाभरात स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या शंभरच्या वर गेली असून रुग्णांची संख्या वाढतच आहे. तर गेल्या महिन्याभरात मलेरीयाच्या रुग्णांचा आकडा पाचशेच्या वर गेली आहे. तर गॅस्ट्रो आजाराच्या रुग्णांची संख्या तर सहाशेच्या वर गेलेली आहे. यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून गेल्या एक महिनाभरातील रुग्णांचा आकडा जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान एकाही रुग्णाचा कोणत्याही आजारामुळे मृत्यू झालेला नाही. जून महिन्यात स्वाईन फ्लूचे केवळ दोन रुग्ण आढलेले. तर मलेरीयाचे जूनमध्ये ३५० रुग्ण होते. दरम्यान मलेरीया आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. मुंबई महापालिकेनेदेखील नागरिकांसाठी मार्गर्दशक सूचना जारी केल्या आहेत.
स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी महापालिकेच्या सूचना
* शिंकताना आणि खोकताना नाक रुमालाने किंवा टिश्यूने झाका
* आपले हात वारंवार साबण आणि पाण्याने धुवा
* आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा