महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई येथे शुक्रवारी पहाटे कार आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक पुण्याहून मुंबईला जात होते. तसेच वाशी खाडी पुलावर पहाटे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.