कोविड-१९चा प्रादुर्भाव होत असल्याने कल्याण-डोंबिवलीत अगोदर कंटेंटमेंट झोन जाहीर केले आहे. तसेच धोका लक्षात घेऊन अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, लोकांना क्वारंटाईन करुनही काही जण घराबाहेर फिरताना दिसत असल्याने कल्याण-डोंबिवली पालिकेने कडक इशारा देताना गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
लॉकडाऊन असताना रुग्णांची सख्या कमी होत नसल्याने दोन तारखेपासून दहा दिवसाचा पुन्हा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेकडून ज्यांच्या घरात सुविधा आहेत, अशा रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. मात्र काही रुग्ण या सुविधेचा गैरफायदा घेत नजर चुकवून घराबाहेर फिरत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असे रुग्ण सोसायटीच्या सदस्यांना न जुमानता बाहेर पडत असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.