श्रद्धा वालकर हीचे वडील विकास वालकर यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्यावर वसई येथील रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आपल्या मुलीच्या हत्ये नंतर श्रद्धाचे वडील विकास हे निराश झाले होते. मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलीच्या उर्वरित तुकड्यांची ते आतुरतेने वाट बघत होते.
श्रद्धा वालकरची निर्घुण हत्या तिच्या लिव्हइन पार्टनर आफताब पूनावाला याने केली नंतर तिच्या मृतदेहाचे 35 टुकड़े करून महरोली मध्ये विल्हेवाट लावली. आफताबला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो कोठडीत आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे टुकड़े अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. श्रद्धाच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण राहिली.श्रद्धाच्या हत्येच्या उलगडा 6 महिन्यानंतर झाला.
श्रद्धाचे कुटुंबीय श्रद्धा आणि आफताबच्या नात्यावर खुश नव्हते. श्रद्धाचा आपल्या कुटुंबाशी संपर्क तुटला होता. श्र्द्धाच्या मित्रांनी श्रद्धाशी गेल्या दीड महिन्यांपासून सम्पर्क झाला नसल्याचे सांगितले. नंतर श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार वसई पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली.प्रकरणाचा तपास सुरु झाला. ती आफताबसोबत दिल्लीत असल्याच पोलिसांना समजले. नंतर वसई पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी सम्पर्क साधला.
चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याचा श्रद्धाशी 18 मे 2022 रोजी वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात येऊन तिची गळा आवळून हत्या केली नंतर तिच्या मृतदेहाचे 35 टुकड़े केल्याचे आफताबने सांगितले. पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे शिल्लक असलेले टुकड़े पुरावा असल्याने तिच्या वडिलांना अंत्यसंस्कारला दिले नाही. आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची तिच्या वडिलांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यापूर्वीच त्यांचे आज निधन झाले.