'या' क्षेत्रातील शाळा सध्या सुरू होणार नाहीत

शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (10:39 IST)
वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईसह ठाणे जिल्हा आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सध्या सुरू होणार नाहीत, असे आदेश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले.
 
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानूसार ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांची व व्यवस्थापनांची विद्यालये बंद राहणार असल्याच्या सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने जारी केल्या. ठाणे  जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना शुक्रवारी तसे निर्देश दिले. तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना संबंधित यंत्रणांना दिले आहेत
 
दुसरीकडे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नसले तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती