मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, राऊत सध्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आज चौकशीला हजर राहू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी राऊतांनी 7 ऑगस्टपर्यंतचा वेळ मागितला आहे. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली.