मुंबईच्या NCP लॉनमध्ये रतन टाटा यांचे अंतिम दर्शन, संध्याकाळी 4 वाजता होईल अंत्यसंस्कार

गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (11:52 IST)
सकाळी 10 वाजल्यापासून रतन टाटा यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी NCP लॉन येथे ठेवण्यात आले आहे. 
 
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर जगभरातील सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र-झारखंडसारख्या राज्यात एक दिवसाचा राज्याचा दुखवटा पाळण्यात आला आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला आहे. 

तसेच NCP लॉनमध्ये मोठ्या संख्येने लोक रतन टाटा यांच्या पार्थिवचे अंतिम दर्शन घेण्यासाठी येत आहे. रतन टाटा यांनी वयाच्या 86 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यामध्ये मंत्री अमित शहा देखील सहभागी होणार आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी राजकीय सन्मानसोबत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती