महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडूनकेलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आले, श्री. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी नामक व्यक्तीने में. गौरी इस्पात, मे तेज स्टील, मे गजाननएंटरप्रायझेस, या नावेमहाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत.
ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्रीव्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. श्री. अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांनी विविध कंपन्यांकडून रु. 105 कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रू. 18.91 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला.
अत्ताउल्हा मोहम्मद नईमचौधरी यांचे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा 2017 च कलम 132 (1) (b) व (C)नुसार गुन्हा असून, कलम 132(1) (i) नुसार कमीतकमी 6 महिने, जास्तीत जास्त 5 वर्ष तुरूंगवास, आणि दंड- इतक्या शिक्षेस पात्र आहे. तसेच या कायदयाच्या कलम 132 (5) नुसार अपराध दखलप्राप्त व अजामिनपात्र आहे.त्यामुळे अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.