मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून CBI चे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना ‘समन्स’

शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (22:11 IST)
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून (Mumbai Police Cyber Cell) समन्स बजाविण्यात आले आहेत. त्यांना राज्य गुप्तवार्ता विभागाच्या लिक झालेल्या रिपोर्टच्या (बदल्यांच्या) प्रकरणात दि. 14 ऑक्टोबरपुर्वी हजर राहण्यास सांगितले आहे.
 
याबाबत एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केलं आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पोलिसांच्या बदल्यासंदर्भातील एक अहवाल लिक झाला होता. त्या प्रकरणा संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स बजाविण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यापुर्वी बदल्यांच्या प्रकरणाचा अहवाल लिक झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. यापुर्वी काही अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे देखील याप्रकरणी विचारपुस करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं थेट सीबीआयचे संचालक (CBI Director) जयस्वाल यांना समन्स दिल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. सायबर सेलनं हे समन्स ई-मेलव्दारे पाठविले असल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं म्हंटलं आहे.
 
सायबर सेल गेल्या काही महिन्यांपासुन याप्रकरणाचा तपास करीत आहेत.आता थेट सीबीआयच्या संचालकांना दि. 14 ऑक्टोबरपुर्वी या प्रकरणात हजर होण्यास सांगितलं आहे.राज्य गुप्तवार्ता विभागाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेल्या बदल्यांच्या प्रकरणातील अहवाल लिक झाला होता.

एवढेच नव्हे तर तो अहवाल सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता. त्या प्रकरणाचा सखोल तपास मुंबई पोलिसांचा सायबर सेल करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती