सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या अमित सिंगने अखेर २५ डिसेंबर रोजी प्रिया सिंगची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या कबुलीनुसार, अमित सिंग आणि प्रिया सिंग रिलेशनशिपमध्ये होते, परंतु तिच्या कुटुंबाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. प्रियाने लग्न करण्यासाठी दबाव आणल्याने, अमित सिंगने तिला ड्राईव्हवर जाण्याच्या बहाण्याने महाजन पाडा येथील पोमन येथील रॉयल पार्क इंडस्ट्रीजवळील एका निर्जन भागात नेले. रात्री 11:00 वाजताच्या सुमारास त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह जवळच्या नाल्यात फेकून दिला.
तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी, अमित सिंगने तिचा सक्रिय मोबाईल फोन राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये ठेवला. आरोपीवर नायगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खून आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे . तो आता कोठडीत आहे आणि तपास नायगाव पोलिस करत आहे.