सदर घटना रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील चिकणपाड्यात रविवारी घडली आहे. सकाळी दशक्रिया सुरु असताना नऊ वाजेच्या सुमारास नाल्यात एका मुलाचे मृतदेह सापडले. हे बघतातच सर्वांना धक्का बसला तेवढ्यात दोन प्रेत अजून आढळली. मदन जैतू पाटील, अनिशा आतील, आणि विवेक पाटील असे या मृतांची नावे आहेत.सर्वांच्या अंगावर जखमांचे व्रण आढळले आहे. हे सर्व कळम्ब बोरगावातील होते. गेल्या 15 वर्षांपासून चिकणपाड्यात वास्तव्यास होते.