मुंबईतील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ किंवा घुंगटला बंदी

गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (15:33 IST)
मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या माटुंगा येथील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये बसण्याला बंदी आहे. महाविद्यालयाच्या नियमावली पुस्तिकेत यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. महाविद्यालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य कपडे परिधान करावेत. कॉलेजच्या आवारात बुरखा/घुंगट किंवा स्कार्फ घालण्यास सक्त मनाई आहे, असे कॉलेजने म्हटले आहे.
 
आमच्या कॉलेजच्या प्रॉस्पेक्टसमध्ये असे लिहिलेल आहे. पूर्वी मुले अशा प्रकारचे कपडे घालून मुलींना त्रास देत होती. ते लक्षात आल्यानंतर मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा नियम लागू केला आहे. या नियमानुसार आम्ही मुलींना वर्गामध्ये बुरखा किंवा घुंगट काढून ठेवण्यास सांगतो. यामागे विद्यार्थ्यांची सुरक्षा हाच मुद्दा आहे. आमच्याकडे मुलींना प्रवेश देताना कोणत्याही धर्म किंवा जातीचा विचार केला जात नाही. सर्व मुलींनी एकसारखे राहून शिक्षण घ्यावे म्हणून बुरखा काढून टाकण्यास सांगितले जाते,” अशी प्रतिक्रिया एमएमपी शाह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना राजे यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती