मुसळधार पावसामुळे भांडुपचे वाटर ट्रीटमेंट प्लांट ठप्प,मुंबईत पाणीपुरवठा रखडला

रविवार, 18 जुलै 2021 (16:16 IST)
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी संपूर्ण मुंबई विभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला कारण आशियातील सर्वात मोठे वॉटर ट्रीटमेंट प्लांट भांडुप मध्ये  वॉटर कॉम्प्लेक्समध्ये पाणी तुंबले आहे.रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळेवाटर ट्रीटमेंट प्लांटच्या मास्टर कंट्रोल सेंटर खराब झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या हायड्रॉलिक्स विभागाने सांगितले की मुंबईला लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल.बीएमसी विभाग म्हणाले, "मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसामुळे पुरवठ्यात अडचण निर्माण झाली होती. नियंत्रण केंद्रात पाण्याखाली गेलेल्या यंत्रणा कार्यरत आहेत की नाही याची चौकशी बीएमसी करीत आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल."
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईत पुरवठा करण्याचे वेळापत्रक वेगवेगळे आहे, त्यामुळे शहरातील काही भागात रविवारी सकाळी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पहाटेच्या बुलेटिन मध्ये सांगितले की मुंबईत हवामानात अचानक बदल झाला आणि सहा तासांत 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.
 
पावसामुळे 25 जणांचा मृत्यू
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस रविवारी सकाळी देखील सुरूच आहे, त्यामुळे सर्वत्र विनाश होण्याचे दृश्य दिसत आहे. येथे, भिंत कोसळण्याशी संबंधित दोन स्वतंत्र अपघातात 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती