मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेचे पोट फुगले होते. जेव्हा तिने ते डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांनी सांगितले की ते अॅसिडिटी आहे. म्हणून ती महिनाभर अॅसिडिटीविरोधी गोळ्या घेत होती, पण रुग्णालयात तिची तपासणी केली असता तिच्या पोटात फुटबॉलपेक्षा मोठी गाठ असल्याचे आढळून आले. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी गर्भाशयाच्या ट्यूमरने ग्रस्त असलेल्या या महिलेवर शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले.