मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकून विटंबना

बुधवार, 17 सप्टेंबर 2025 (12:29 IST)
social media
मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क परिसरात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने लाल रंग टाकून पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना आज सकाळी 6 ते 6:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 
ALSO READ: मुंबई मोनोरेल सेवा या दिवसापासून तात्पुरती बंद राहणार एमएमआरडीएने मोठा निर्णय घेतला
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून त्यात एक व्यक्ती पुतळ्याजवळ फिरताना दिसत आहे. पोलीस या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी ठाकरे गटाकडून औपचारिक तक्रार दाखल केल्यावर गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र तक्रार न आल्यावर पोलीस स्वतः अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करतील. 
ALSO READ: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ह्युंदाई मोटरच्या सीएसआर प्रकल्पांचा शुभारंभ
या घटनेची माहिती मिळतातच शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुतळ्याच्या बाजूला पडलेला लाल रंग स्वच्छ केला. या वेळी स्थानिक आमदार आणि खासदारांनी देखील स्वच्छतेच्या कार्यात सहभाग घेतला. आणि परिसर स्वच्छ केला. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले. मीनाताई ठाकरे यांचा पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कारवाई करावी. पुतळ्याचा असा अपमान सहन केला जाणार नाही.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: नवी मुंबई विमानतळ नोव्हेंबरपासून उड्डाणे सुरू करणार

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती