परमबीर सिंह यांचा पगार थांबवण्याचा निर्णय, फरार घोषित करण्याचाही निर्णय घेणार?

बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (09:46 IST)
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा पगार थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. त्यानंतर परमबीर यांच्यावरही आरोप केले गेले.
 
या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंह हे गायब आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरासमोर नोटीस लावून त्यांना हजर होण्यास सांगितलं होतं, मात्र ते उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

अँटेलिया स्फोटक प्रकरणानंतर परमबीर यांनी अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर पुढच्या काळात त्यांच्यावरही आरोप झाले. त्यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात गुन्हेही दाखल झाले.
परमबीर हे मे महिन्यात सुटीवर गेले होते. पण त्यानंतर अजूनपर्यंत ते परतलेले नाहीत. तसंच त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल गृह विभागालाही काही कळवलेलं नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती