वसईच्या महसूल विभागाने अधिवासी बांधवांनी अतिक्रमण केलेल्या वनजमिनीवरील त्यांच्या नावे वनपट्टी लावल्या आहेत. वनजमिनीवर आपल्या नावे वनपट्टी लावण्यासाठी आधिवासी बांधवांनी तब्बल ३५ ते ४० वर्ष शासनाशी संघर्ष केला होता. त्यानंतर १९९६ साली आधिवासी बांधवांच्या बाजूने वनहक्क कायदा काढला गेला. माञ त्यात बऱ्याच ञुटी होत्या. त्यानंतर २००६ साली त्यात सुधारणा करुन, नव्याने सुधारीत वनहक्क कायदा अंमलात आला. दरम्यान आधिवासीच्या वनजमिनी त्यांच्या नावावर झाल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आधिवासीना वनपट्टी मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
वसई प्रांत अधिकाऱ्यांनी आज वसईतील भाताने, आडाणे, भिनार, सकवार, वाडघर येथील ५० आधिवासी बांधवाना ३०६ हेक्टर जमिनीच्या वनपट्टी त्यांच्या नावावर केल्या आहेत. यामुळे आता ते या जमिनीवर शासकीय योजनेचा लाभ घेतील. तसेच शेती, भाजीपाला लागवड करुन, उत्त्पन घेवू शकतात. त्यांच्या नावावर त्या जमिनीचा सातबारा ही आता करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आधिवासी खऱ्याअर्थाने जमिनीचे मालक होणार असल्याच मत प्रांत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.