मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा, राज्य सरकारचं अॅप आणि UTS लिंक

बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (09:17 IST)
कोव्हिड लशीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस उलटलेल्या लोकांना मुंबई लोकलने प्रवास करता येतो. या प्रवाशांना तिकीट मिळणं सोपं जावं यासाठी आता काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या युनिव्हर्सल पासशी रेल्वेने त्यांचं युटीएस मोबाईल अॅप लिंक केलंय. त्यामुळे आता लोकल प्रवाशांना या अॅपद्वारे तिकीटं आणि मासिक पास काढता येतील.
यामुळे तिकीट खिडकीवरील गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना तिकीट काढणंही सोपं होईल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती