मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह राज्यातील 18 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या महानगरपालिकांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने पत्र पाठवले आहे. निवडणूक आयोगाने 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना हे पत्र पाठवले आहे. यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, मीरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.