मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आगामी उत्सवांमध्ये घरे पाडण्याची कारवाई पुढे ढकलण्याचे स्पष्ट आदेश दिले आहे. बावनकुळे यांनी बुधवारी सांगितले की, उत्सव काळात घरे पाडण्याची सूचना देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नका. जी काही कारवाई करायची आहे ती गणेशोत्सवानंतर करा. तोपर्यंत अधिकाऱ्यांनी लोकांना कोणतीही सूचना देऊ नये.
गणेशोत्सवापर्यंत कारवाई थांबवण्याचे आदेश
भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक तावडे आणि महसूल विभागाचे अधिकारी बैठकीत उपस्थित होते. बैठकीत नागरिकांच्या विनंतीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून महसूल मंत्री बावनकुळे यांनी गणेशोत्सवापर्यंत ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहे. परंतु बनावट नकाशे तयार करून बांधकाम करणाऱ्यांना सूट मिळणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.