ग्लोबल टेंडरला प्रतिसाद म्हणून आलेल्या सर्व ९ निविदा रद्द

शनिवार, 5 जून 2021 (08:40 IST)
मुंबई महानगर पालिकेनं  कोरोना लस पुरवठ्यासाठी जारी केलेल्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद म्हणून आलेल्या सर्व ९ निविदा पालिका प्रशासनाने रद्द केल्या आहेत. या निविदांसोबत आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लस पुरवठ्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू झाले असून स्पुटनिक व्हीच्या पुरवठ्यासाठी डॉ. रेड्डीच लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरू असल्याचं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
मे महिन्यात मुंबई महानगर पालिकेनं करोनाच्या लसीचे एक कोटी डोस मिळवण्यासाठी ग्लोबल टेंडर जाहीर केलं होतं. यासाठी पालिकेकडे एकूण ९ लस पुरवठादारांच्या निविदा सादर झाल्या. यापैकी ८ निविदा या स्पुटनिक व्ही लसीच्या पुरवठ्यासाठी होत्या तर एक निविदा ही फायझर आणि अॅस्ट्राझेनेका लसीच्या पुरवठ्यासाठी होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती