एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्ली विमानतळाकडे वळवण्यात आले. तसेच सर्व प्रवासी सुरक्षित असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकारींनी सांगितले आहे. सध्या विमान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. व विमानाचा तपास सुरू आहे.