किरीट सोमय्यांच्या व्हिडीओ प्रकरणाबाबत मोठी अपडेट !

गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (07:54 IST)
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका खासगी वृत्त वाहिनीच्या संपादकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.
 
या प्रकरणात सोमय्या यांचे व्हिडीओ एका खासगी वृत्त वाहिनीने दाखवले होते. त्यामुळे माझी बदनामी झाली असे किरीट सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले होते. सोमय्यांचे व्हिडीओ प्रकरण विधानसभेसह राज्यभर गाजले होते.
 
काही पक्ष, संघटनांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. आता या प्रकरणात दोन संपादकांवर सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती