व्हायरल होत असलेला फोटो खोटा
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना ने व्हायरल पोस्ट ट्विटर वर शेअर केली. पाठोपाठ इतर यूजर्सने देखील ही बातमी शेअर केली. तसेच एका न्यूज वेबसाइटनेही व्हायरल दावा शेअर केल्याने अधिकच गोंधळ निर्माण झाला. मात्र नाल्यात वाहून गेलेल्या 4 महिन्यांच्या बाळाच्या जिवंत असल्याबद्दलच्या व्हायरल पोस्ट खोट्या आहेत. व्हायरल होत असलेला फोटोचा या घटनेशी कोणताही संबंध नसून एनडीआरएफची शोधमोहीम अजूनही सुरू आहे.
बुधवारी कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान अंबरनाथ लोकल पावसामुळे थांबली असताना यामधून उतरून एक महिला व एक व्यक्ती 4 महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील अरुंद रस्त्यावरून चालले होते. तेव्हा व्यक्तिच्या हातात असलेले बाळ निसटून नाल्यात पडल्याची हृदयद्रावक घटना घडली. याही घटनेचा व्हायरल व्हिडीओ समोर येताच एकच खळबळ उडाली.