देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काल रात्री दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्यात आतापर्यत 100 नागरिक ठार तर 300 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेंट जॉर्ट रुग्णालयात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. रक्ताअभावी जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना मोठी अडचण होत आहे.
जखमींची संख्या वाढण्याची शक्यता येथे वर्तवली जात आहे. शेकडो नागरिकांना वाचविण्यासाठी डॉक्टरांचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुंबईकरांनी रक्तदान करून जखमींना नवसंजीवनी द्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अधिकृत सुत्रांनी केले आहे.