रुग्‍णालये भरले मृतदेहांनी....

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (14:38 IST)
सतत घोंगावणा-या एम्‍ब्‍युलन्‍स... जखमींच्‍या किंकाळ्या आणि मृतांच्‍या नातेवाईकांचा टाहो... अशा हृदयपिळवटून टाकणारे दृश्‍य गेल्‍या 36 तासांपासून मुंबईतील रुग्‍णालयांमध्‍ये पहायला मिळते आहे. मुंबईत दहशतवाद्यांनी मांडलेला उच्‍छाद आणि त्‍यात मृत आणि जखमी झालेल्‍यांना रुग्‍णालयांमध्‍ये आणले जात होते.

सेंट जॉर्ज रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आलेल्‍या 103 जखमींपैकी सुमारे 70 जणांना मृत्‍यू झाला असून त्‍यात वृध्‍द पुरुष, महिला व लहान मुलांचाही समावेश आहे.

जखमींपैकी अनेकांचा उपचारापूर्वीच मृत्‍यू झाल्‍याने रुग्‍णालये मृतदेहांनी भरून गेले आहेत. या मृतांमध्‍ये अनेक जखमींचाही समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा